गैरव्यवहार प्रकरणातील चंदा कोचर यांचे पती दीपक यांना खासगी रुग्णालयात उपचारास परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन – आयसीआयसीआय बँक -व्हिडीओकॉन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या दीपक कोचर यांना खासगी रुग्णालयातील उपचारास परवानगी देण्यात आली आहे. दीपक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना दिल्ली येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सव्र्हिसेस’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना विशेष न्यायालयाने खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली. दीपक यांना विविध आजार आहेत. त्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाकडे केली होती. कोचर हे न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयाने त्यांच्या अर्जावर योग्य तो आदेश द्यावा, असे ‘ईड’ने स्पष्ट केले. कोचर आणि ‘ईड’चे म्हणणे ऐकल्यावर विशेष न्यायालयाने कोचर यांना अपोलो वा मेदांता रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like