भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते त्यांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B07G26PLDJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13dbb028-b9af-11e8-b8d9-4d96e40e4bc6′]

पिंपरी-चिंचवडमधील उद्योगक्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे दीपक मोढवे-पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वाहतूक आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, महापालिका निवडणूकही त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली होती. भाजपच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी मोढवे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. युवकांचे संघटन आणि उद्योग क्षेत्राकडे वळण्यासाठी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मोढवे-पाटील यांनी कायम पुढाकार घेतला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.