Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Sevadal Maharashtra State President) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्ती असलेले लोणावळ्यातील दीपक रामचंद्र मानकर यांचे (Deepak Ramchandra Mankar) गुरुवारी (दि.14) अल्पशा आजाराने निधन झाले. मानकर यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह लोणावळ्यातील (Lonavala) एक हरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची (Deepak Ramchandra Mankar) भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह माजी खासदार अशोकराव मोहोळ (Ashokrao Mohol) यांच्यावर प्रचंड निष्ठा असणारे दीपक मानकर हे मोठे मंडप व्यावसायिक होते.
पक्ष आणि पक्षप्रमुखांवर असलेली निष्ठा आणि कार्यतत्परता, संघटन कौशल्य यामुळे त्यांना जिल्हा सेवादल व महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्या अध्यक्षपदावर कम करण्याची संधी मिळाली.

शाहरुख नावाने ओळख

मानकर यांना राष्ट्रावादीसह सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते ‘शाहरुख’ या नावाने ओळखत होते.
शरद पवार आणि अजित पवार हे देखील त्यांना शाहरुख म्हणून हाक मारत.
या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात कोठेही सभा असली तर त्या ठिकाणी दीपक मानकर हे सभेच्या ठिकाणी दोन्ही पवारांच्या मागे उभे राहत होते.

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अखेर आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची लोणावळ्यातील सिद्धार्थनगर येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title : Deepak Ramchandra Mankar | ncp leader deepak ramchandra mankar passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी WIPRO ने रचला इतिहास, गुंतवणुकदारांना केले एका वर्षात ‘मालामाल’

PMPML च्या ताफ्यात लवकरच 350 नवीन ई बसेस दाखल होणार !

Kolhapur Crime | दुर्दैवी ! दांडीया पाहून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, 2 जण गंभीर जखमी