Deepali Dhumal | पुणे शहरात सर्व ठिकाणी शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा

माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune City) सर्वसामान्य, गोरगरीब व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा (Shahri Garib Yojna) फायदा मिळावा यासाठी शहराच्या चारही दिशांना हे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी केली आहे. याबाबतचे निवदेन दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य विभागाला (Health Department) दिले आहे.

 

दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, पुणे महानगरपालिकेची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली आणि यशस्वी ठरलेली एकमेव योजना म्हणजे शहरी गरीब योजना सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक व दारिद्रय रेषेखालील नागरिक यांना या योजनेचा अनेक वर्षांपासून लाभ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कार्यकाळामध्ये ही योजना चालू झाली व गेले अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे पुणे शहरात ही योजना चालू आहे. यामुळेच एक एप्रिलला आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली.

महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड (Card) काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली पुणे महानगरपालिका आहे.

 

खडकवासला (Khadakwasla), कोंढवे-धावडे (Kondhve-Dhavde), उत्तमनगर (Uttam Nagar), शिवने (Shivane), नऱ्हे-आंबेगाव (Narhe-Ambegaon), नादोशी (Nadoshi), नांदेड (Nanded), किरकीट वाडी (Kirkit Wadi), वाघोली (Wagholi), फुरसुंगी (Fursungi), उरुळी देवाची (Uruli Devachi), लोहगाव (Lohgaon), कात्रज (Katraj) इत्यादी महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधून व शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी येत असतात.

महानगरपालिकेच्या सेवा सुविधा व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महानगरपालिकेचे
त्या त्या परिसरामध्ये क्षेत्रीय कार्यालय (Regional Office), मिळकत कर भरणा केंद्र (Income Tax Payment Center)
अशा प्रकारचे विविध कार्यालये आहेत अशा शहराच्या चारही बाजूस असलेल्या कार्यालयांमध्ये शहरी
गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध केल्यास त्याच परिसरात नागरिकांना सदर योजनेचे कार्ड मिळेल.
तसेच ही योजना सुटसुटीतपणे व अधिक सक्षमपणे राबविली जाईल.

 

Web Title :- Deepali Dhumal | Provide facility to get urban poor scheme card at all places in Pune city; Demand of former Leader of Opposition Deepali Dhumal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा