Deepali Sayed | अभिनेत्री दिपाली सय्यद यांची देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत शेलक्या भाषेत टीका, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepali Sayed | मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांची टीकेची भाषा आणि पातळी कमालीची घसरली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत (Offensive Language) टीका केल्याचे ताजे असतानाच आता अभिनेत्री आणि शिवसेना (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दीपाली सय्यद  यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला काल देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच शारीरिक रचनेवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्याच भाषेत त्यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता दीपाली सय्यद (Deepali Sayed)  यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दात निशाणा साधला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये दीपाली सय्यद म्हणाल्या की, वजनदाराने पुरणपोळी खाके हल्केसे वेगळा विदर्भ मांग्या । दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसुफ लकडावाला (Yusuf Lakdawala) से ढोंग्या । जिसको हल्के मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या ।, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये फडणवीस यांच्या वजन आणि वयावरुन खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मी बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली (Babri Masjid Demolition) असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना मला सांगायचे आहे बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन 128 किलो होते आता 102 आहे. पण, मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयची (FSI) भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय 1 असेल तर आज माझा 2 आहे आणि बाबरी पाडताना तो 2.5 होता, असे फडणवीस म्हणाले होते.

 

Web Title :- Deepali Sayed | deepali sayeds criticism of devendra fadnavis in offensive language giving shellac adjectives said…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा, राष्ट्रवादीचा पाठिंबा; शरद पवारांनी सांगितला विजयाचा ‘हा’ फॉर्म्युला

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारपासून पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंना भेटीसाठी…

 

Pune NCP | महागाईसाठी तत्कालीन पंतप्रधानांना भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या, तीच भेट सध्याच्या पंतप्रधानांना देण्याची वेळ आली; प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल