अभिनेत्री दीपाली सय्यद यांची माघार, उपोषण सोडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – साकळाई सिंचन योजना चालू करावी, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे उपोषण अखेर तिसर्‍या दिवशी सुटले. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर दिलेल्या आश्वासनानंतर दीपाली सय्यद यांनी राम शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले आहे.

साकळाई कृती समितीच्यावतीने सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह कृती समितीचे सदस्य गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषद आवारात साकळाई उपसासिंचन योजना सुरू करावी, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते. दोन दिवस सरकारने कोणत्याही हालचाली न केल्याने सय्यद यांची प्रकृती ढासळत चालली होती. मात्र आज पालकमंत्री राम शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यासह कृती समिती सदस्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली.

तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर संपर्क करून देत साकळाई पाणी योजनेसंदर्भात चालू असलेली कारवाईबाबत माहिती दिली. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. मात्र १ सप्टेंबरपर्यंत योजना मंजूर नाही, झाली तर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा दीपाली सय्यद यांनी इशारा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like