Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ठाकरे गटाला (Thackeray Group) आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपाली सय्यद (Deepali Sayyad) बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्विकारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मी येत्या तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे, असं दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी सांगितलं. तसेच जी जबाबदारी दिली जाईल, ती मी स्विकारण्यास तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्याचं कारण काय असे विचारले असता त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) खापर फोडलं. संजय राऊत यांना आपल्या पापाची शिक्षा झाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्यामुळे या गोष्टी घडत गेल्या असून दोन वेगळे गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच मला शिवसेनेत आणलं असल्याने त्यांच्यासोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे.

रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation (BMC) खोके मातोश्रीवर येणं
बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सुत्रधार आहेत,
असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला. खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं
पाहिजे. तसेच मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हे देखील कळलं पाहिजे, असंही सय्यद म्हणाल्या.

Web Title :-  Deepali Sayyad | shivsena Deepali Sayyad will join eknath shinde group maharashtra news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt-Ranbir Kapoor | आलिया-रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याने लिहिली ‘हि’ खास पोस्ट

Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल