दीपिका आणि रणवीरचे होणार ‘या’ ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग

मुंबई: वृत्तसंस्था

बॉलिवूड मधल्या बऱ्याच सेलिब्रेटींनी यावर्षी लग्नाचा घाट घातला आहे. काही महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हि जोडी लग्नबंधनात अडकली ,या पाठोपाठ सोनम कपूर ,हिमेश रेशमिया ,नेहा धुपिया हे देखील लग्नबंधनात अडकले .आता बॉलिवूडची फेव्हरेट जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरूआहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांच्या लग्नाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका येत्या नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे आता दोघेही लग्नाच्या तयारीत आहेत. गेल्या पाच वर्षापासून रणवीर आणि दिपिका एकमेकांना डेट करत आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीर यांचेदेखील डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. या विवाहासाठी त्यांनी इटली हे ठिकाण निवडले आहे. काही दिवसांपूर्वी डेस्टिनेशन वेडिंग करण्याची दोघांची इच्छा होती मात्र रणवीरच्या घरच्यांना हे लग्न मुंबईच करायचे होते अशी चर्चा होती. त्यामुळे या दोघांचे लग्न नक्की कुठे होणार याबद्दल प्रश्नचिन्ह होते. मात्र आता हे लग्न इटली मध्ये होणार असल्याचे वृत्त आहे. सध्या रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ आणि जोया अख्तर च्या ‘गली बॉय ‘ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. पण दीपिकाने मात्र पद्मावत नंतर एकही सिनेमा साइन न केल्याचे दिसून आले आहे.