‘छपाक’ बाबत ट्विटरवर नवा ‘वाद’, अ‍ॅसिड फेकणार्‍याचं नाव का बदललं गेलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना भेटणे दीपिकाला खूप महागात पडले आहे. आता तिचा आगामी ‘छपाक’ चित्रपटावर लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर लोक विचारत आहे की, लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर नदीम खान नावाच्या व्यक्तीने अ‍ॅसिड फेकले होते. तिचा बायोपिक ‘छपाक’ मध्ये त्या व्यक्तीचे नाव का बददले आहे. सोशल मीडियावर युजर्स दावा करत आहे की, नदीमच्या कॅरेक्टरचे नाव राजेश आहे. याला घेऊन आता सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

https://twitter.com/DrGPradhan/status/1214807564388405250

https://www.instagram.com/p/B6M1oPpjHGC/

युजर्सचे म्हणणे आहे की, जर हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे तर मग चित्रपटामध्ये लक्ष्मी अग्रवालवर अ‍ॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलले इथपर्यंत ठिक होते पण त्या व्यक्तीला हिंदू का दाखवले गेले. या चित्रपटात दीपिकाच्या कॅरेक्टरचे नाव लक्ष्मी न ठेवता मालती ठेवले आहे.

https://www.instagram.com/p/B7AjR3tjqhb/

हे वाद तेव्हापासून सुरु झाले जेव्हा दीपिका जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेली. याबद्दल तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण यानंतर दीपिका वारंवर ट्रोल होत आहे. तिचे काही जुने व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘छपाक’ दीपिकाच्या बॅनरचा पहिला चित्रपट असणार आहे. चित्रपटात विक्रांत मैसी दीपिकासोबत दिसणार आहे. विक्रांत चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. जो मालतीला न्याय देण्यासाठी तिला साथ देतो. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/B6xizjeD3Kc/

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/