दिपीका चिखलियानं सांगितलं जर बॉलीवूडमध्ये ‘रामायण’ सिनेमा बनला तर कोण होईल ‘राम-सीता’ आणि ‘रावण’, जाणून घ्या


पोलीसनामा ऑनलाईन :
सध्या लॉकडाऊनमध्ये 80 च्या दशकातील रामायण या मालिकेचं पुन्हा प्रासारण सुरू झालं आहे. रामानंद सागर यांची ही मालिकेच सर्वाधिक टीआरपी घेताना दिसत आहे. अशात अशी माहिती समोर आली आहे की, बॉलिवूडचे डायरेक्टर नितेश तिवारी हे रामायणवर बिग बजेट सिनेमा तयार करणार आहेत. यावरून टीव्हीची सीता दीपिका चिखलिया हिला प्रश्न विचारले असता तिनं यावर खुलून भाष्य केलं आहे.

दीपिका चिखलियानं रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखीतत दीपिकानं यावर भाष्य केलं आहे. दीपिकाला विचारण्यात आलं की, रामायणवर सिनेमा आल्यानंतर राम आणि सीतेच्या भूमिकेसाठी कोणता बॉलिवूड स्टार योग्य राहिल. यावर बोलताना दीपिका म्हणाली, “रामायण एक असा शो आहे ज्यात आत्माही संलग्न होतो.”

पुढे बोलताना दीपिका म्हणते, “सीतेच्या भूमिकेसाठी बॉलिवूड स्टार आलिया भट सही राहिल. अभिनेता हृतिक रोशन भगवान रामाच्या भूमिकेसाठी योग्य राहिल. रावणाच्या भूमिकेसाठी अजय देवगण योग्य असेल. तर वरूण धवन लक्ष्मणाच्या रोलसाठी सही आहे.”

सध्या देशात कोरोनामुळं 21 दिवस लॉकडाऊन आहे. अशात लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक मालिका रिपीट टेलीकास्ट होताना दिसत आहेत. यात रामायण आणि महाभारत यासह इतर मालिकांचाही समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like