‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात लिहिले होतं – ‘माल आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या दीपिका पादुकोण बद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अशी माहिती मिळाली आहे की, दीपिका पादुकोण त्या व्हाट्सएप ग्रुपची ऍडमिन होती, ज्यात ड्रग्जची मागणी केली जात होती. दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये त्या ग्रुपवर ड्रग्जची मागणी केली होती. असे सांगितले जात आहे की, जया शाह आणि करिश्मा देखील त्या ग्रुपवर हजर होत्या. अशा परिस्थितीत दीपिकाच्या अडचणी आता वाढू शकतात.

दीपिकाची अडचण वाढली
शनिवारी एनसीबीने दीपिका पादुकोणला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याचबरोबर क्वान कंपनीची मॅनेजर करिश्माची शुक्रवारीच चौकशी होणार आहे. या दरम्यान आता ही बातमी येणे कि दीपिका त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची ऍडमिन होती, ज्यावर ड्रग्जची चर्चा व्हायची, यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. दीपिका केवळ या वादात सहभागी होताना दिसत नाही, तर तिची सक्रिय भूमिकाही समोर येत आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबीही या बाबीवर दीपिकाला कठोर प्रश्न विचारू शकते.

एनसीबीची चौकशी
दीपिका पादुकोणची शुक्रवारीच चौकशी होणार होती. पण नंतर तिला शनिवारी बोलावण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी फक्त रकुल प्रीत सिंह आणि करिश्मा यांचीच चौकशी केली जाईल. रकुलची दीर्घ काळापासून चौकशी सुरु आहे. तर करिश्माची देखील चौकशी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत हा वादही थांबणार नाही आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींवर एनसीबीची चौकशीही थांबणार नाही. एनसीबी दीपिकाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारणार असल्याचेही सांगितले जात आहे. एक यादी तयार केली गेली आहे आणि त्या आधारावरच तिची चौकशी केली जाईल. दीपिकाशिवाय सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही एनसीबी चौकशी करणार आहे. त्यांनाही २६ तारखेला समन्स दिले गेले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like