Deepika Kakkar | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर भडकले लोक; म्हणाले “इतका अहंकार चांगला नाही”

पोलीसनामा ऑनलाईन : Deepika Kakkar |  ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरात पोहोचली होती. तिच्या चांगल्या वागणुकीमुळे देखील प्रेक्षक नेहमीच तिचे कौतुक करत असतात. दीपिका नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. एवढेच नाही तर तिच्या डाऊन टू अर्थ स्वभावामुळे चाहते नेहमीच तिचे कौतुक करत असतात. मात्र यंदा दीपिकाचा (Deepika Kakkar) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो पाहून तिचे चाहते देखील तिच्यावर भडकले असल्याचे दिसत आहे.

नुकताच दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिमने दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी दीपिका खूप आनंदी देखील वाटत होती. त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. इव्हेंट मधून दीपिका बाहेर पडताच तिचा तोल जातो आणि ती पडायला लागल्यावर तितक्यात एक व्यक्ती तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीने अभिनेत्रीला हात लावताच ती त्याच्यावर भडकते. हा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्या व्यक्तीने तिची मदत केली त्याच्यावरच ती भडकल्याने नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून दीपिकाला सुनावले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच आज अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की “त्यांनी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तू त्याचा अपमान केला”. तर दुसऱ्याने लिहिले “तुझे हे वर्तवणूक अपेक्षित नव्हते….. त्याला धन्यवाद म्हणण्याऐवजी त्याच्यावर चांगलीच भडकली ही काही चांगली गोष्ट नाही”. तर तिसऱ्या युजरने लिहिले “इतका अहंकार चांगला नाही”. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की “अनावश्यक्य कृती होती तो खरं तर तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होता तू पडली असती तर तेच बरे झाले असते तिला एकटी राहू द्या”. या अशा एक ना अनेक कमेंट ने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दीपिका नेहमीच तिच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
एवढेच नाही तर ती youtube वर ही तिचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते.
दीपिकाने अनेक मालिकांमधून काम करत तिच्या अभिनयांचा ठसा प्रत्येकाच्या मनावर उमटवला आहे.

Web Title :- Deepika Kakkar | actress deepika kakkar got angry at the person who helped her video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक