पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजमौली (S. S. Rajamouli) हे आर. आर. आर. सिनेमाच्या भरघोष यशानंतर आता नवीन चित्रपटाच्या कामाला लागले आहे. राजमौली हे आता दीपिका पादुकोन (Deepika Padukone) ला घेऊन नवीन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. साऊथचा सुपरहिरो महेश बाबू (Mahesh Babu) आणि बॉलीवूड स्टार दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांच्या प्रमुख भूमिका असलेला SSMB28 हा सिनेमा तयार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/urstrulyMahesh/status/1639975979098722306?s=20
दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा आर. आर. आर. (RRR) चित्रपट चांगलाच गाजला. यातील नाटू नाटू गाण्याला (Natu Natu Song) बेस्ट ओरिजनल सॉन्गसाठी ऑस्कर अवॉर्ड (Oscar Award) देखील मिळाला आहे. या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यावेळी अभिनेत्री दीपिका पादूकोन ही दिसली होती. आता दीपिकाच एस.एस.राजमौली यांच्या पुढच्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावताना दिसत आहे. आर आर आर मध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) हिने महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता नव्या SSMB28 या सिनेमासाठी राजमौलींनी बॉलीवूडच्या अभिनेत्यांची निवड केली आहे. नायिका म्हणून दीपिका तर चित्रपटातील महत्त्वाचा विलन म्हणून अभिनेता अमीर खानची (Actor Aamir Khan) निवड करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
सुपरस्टार महेश बाबूने आपल्या ट्विटर हॅन्डेलवरुन (Twitter) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.
यामध्ये अभिनेता महेश बाबू डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
या पोस्टरवरून चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 2024 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र अभिनेत्री दीपिका पादूकोन हिचे कोणतेही पोस्टर अजून रिलीज करण्यात आलेले नाही.
Web Title : Deepika Padukone | After the resounding success of RRR, director S. S. Deepika Padukone will be seen in Rajamouli’s next film
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा