बॉलीवूडच्या ‘या’ टॉपच्या 2 अभिनेत्री इन्स्टाग्रामवरील ‘फेक’ फॉलोअर्सच्या यादीत ‘Top 10’ मध्ये, जाणून घ्या दीपिका, प्रियांकाच ‘स्थान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : आजकाल सोशल मीडियावरील फॉलोवर्स ची संख्या हा सेलिब्रिटींची प्रसिद्धी मोजण्याचा एक मापदंड झाला आहे. तसेच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेक स्टार्स सातत्याने त्यांची विविध माहिती शेअर करताना दिसतात. इन्स्टाग्राम हे खास फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी यावर फोटो आणि व्हिडीओ यावर शेअर करत असतात. मात्र अलीकडेच समोर आलेल्या अहवालातील माहितीनुसार बॉलिवूडमधील काही सेलिब्रीटींचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोवर्स फेक असल्याचा दावा करण्यात आला असून या यादीमध्ये दीपिका पदूकोण आणि प्रियांका चोप्रा यांचा टॉप १० सेलिब्रीटींमध्ये समावेश आहे.

इंस्टीट्यूट ऑफ कंटेपररी म्यूजिक परफॉरन्स (ICMP) ने केलेल्या संशोधनानुसार जगभरातील अनेक सेलिब्रीटींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फेक फॉलोअर्स असल्याची माहिती स्पष्ट झाली. या यादीनुसार प्रियांकाचे १० कोटींपैकी ४३ टक्के म्हणजे ४ कोटी फॉलोअर्स फेक असून दीपिकाचे ४५ टक्के म्हणजेच १३ कोटी फॉलोअर्समधीस जवळजवळ ६ कोटी फॉलोअर्स फेक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या यादीमध्ये दीपिका ६ व्या तर प्रियांका १० व्या क्रमांकावर आहे.

आणखी कोण आहे यादीमध्ये :

टॉक शो होस्ट एलेन डीजेनेरेस हा टॉक शो होस्ट एलेन डीजेनेरेस आहे. तर बॉय-बॅन्ड बीटीएस यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांचे अनुक्रमे ५८ टक्के आणि ४८ टक्के फेक फॉलोवर्स आहेत. या इन्स्टाग्रामच्या फेक फॉलोअर्स यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे देखील नाव देखील आहे. हे सर्व सेलिब्रेटी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टसाठी कंपनीपासून कोट्यावधी रुपये घेत असतात.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like