दीपिका पदुकोणही पोहचली JNU मध्ये, कन्हैया कुमारबरोबर विद्यार्थ्यांची घेतली भेट (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. आता स्टार अभिनेत्री दिपिका पादूकोणही जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी दाखल झाली. दिपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी तिच्यासोबत कन्हैया कुमारही उपस्थित होते.

रविवारी रात्री काही बुरखाधारी लोकांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थी आणि प्रध्यापकांना मारहाण केली. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री रात्रभर मुंबईत अनेक सेलिब्रेटींना आंदोलन करताना पहायला मिळाले. या दरम्यान दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आंदोलनात एक कविता सादर केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशाल भारद्वाज यांनी सादर केलेली कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विट अकाऊंटवरही शेअर केली आहे. “हम मायूस नही है, हम हैरान नहीं, जैसा सोचा था तुम वैसे ही निकले”, असे या कवितेचे बोल आहेत. या कवितेतून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. विशाल यांची ही कविता सर्वांनाच आवडली असून हजारो लोकांनी ही कविता आतापर्यंत शेअर केली आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा या आधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/