इरफान खानसोबतचा व्हिडीओ शेअर करत ‘इमोशनल’ झाली दीपिका पादुकोण ! म्हणाली- ‘प्लिज परत ये’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खान आज आपल्यात नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून चाहते आणि त्याचे काही सहकलाकार त्याला मिस करत आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करून ते आपल्या भावना मांडत आहेत. अलीकडेच दीपिका पादुकोणनं एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे जी सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_85GFyD8qn/

इरफान आणि दीपिका पादुकोण यांनी पीकू या सिनेमात एकत्र काम केलं होतं. शुक्रवारी (दि 8 मे) पीकू सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानं इरफान खाननं दीपिकाची आठवण काढली आहे. शनिवारी (दि 9 मे) दीपिकानं एक व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B_66-Ckjiur/

दीपिकानं तिच्या इंस्टावरून जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात इरफान खान आणि दीपिका लॉनवर टेनिस खेळताना दिसत आहेत. पीकू सिनेमातील शुटींग दरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ शेअर करताना दीपिका म्हणते, “परत ये इरफान खान.” दीपिकाचा हा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या पाच तासात व्हिडीओला 3.8 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B9ix9kUjrpc/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B9iyA9UjNP8/

https://www.instagram.com/p/B9ix_W9jh2G/

https://www.instagram.com/p/B9gJgmiD7kG/

https://www.instagram.com/p/B9gJbmHjmuv/

https://www.instagram.com/p/B9Y5hXejh76/