Deepika Padukone Bikini Bold Photos | दीपिका पादुकोनचे हॉट फोटो झाले लीक, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepika Padukone Bikini Bold Photos | बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक असलेली दीपिका पादुकोन (Deepika Padukone) नेहमीच चर्चेत असते. दीपिकाने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट (Hit Movie) दिले आहेत. तिचा आताचा ‘गहराईया’ (Gehraiyaan) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ती तिच्या आगामी ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र अशातच दीपिकाचा एक बोल्ड नियॉन ग्रीन स्विमसूट परिधान केलेला फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल (Viral Photo) झाला आहे. (Deepika Padukone Bikini Bold Photos)
या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shah Rukh Khan) मुख्य अभिनेता आहे. शाहरूखचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र शाहरूखनंतर आता अभिनेत्री दीपिकाचेही फोटो सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दीपिकाने पिवळ्या रंगाचा नियॉन ग्रीन स्विमसूट (Green swimsuit) घातलेला दिसत आहे.
दीपिकाच्या या हॉट लूकमुळे (Hot look)चाहतेही अवाक झाले आहेत. याआधी अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) सांगितलं होतं की दीपिकाचा पठाण चित्रपटामधील लूक हा एकदम हॉट असणार आहे. आता व्हायरल झालेल्या फोटोमुळे हे निश्चित झालं आहे. पठाण चित्रपटाचं चित्रीकरण स्पेन (Spain) या देशामध्ये चालू आहे.
दरम्यान, दीपिकाच्याआधी शाहरूख खानची बॉडी पाहून सर्वजण थक्क झाले होते. आता दीपिकाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहते पठाण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Web Title :- Deepika Padukone Bikini Bold Photos viral on social media discussion going on
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune NCP | पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची होळी
Holi Tips For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी होळी खेळणं आहे का सुरक्षित?, वाचा सविस्तर