दीपिका पादुकोणचा फॅशन ‘बलमा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोणच्या करिअरचा ग्राफ वेगानं वर जाताना दिसत आहे. ती सलग एका मागोमाग एक चांगले सिनेमे करताना दिसत आहे. सध्या ती आपल्या सिनेमातून खूप लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. अ‍ॅक्टींग व्यतिरीक्त आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळेही दीपिका चर्चेत येताना दिसत असते. कधी तिचं चाहत्यांकडून कौतुक होतं तर कधी तिला ट्रोलही केलं जातं.

अलीकडेच दीपिकानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिचा आऊटफिट लोकांना आवडला नाही असं दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दीपिका एका फ्रेंच ब्रँडला प्रमोट करत आहे. Balmin असं या ब्रँडचं नाव आहे. दीपिकानं फोटो शेअर करताना कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये दीपिका म्हणते, “बलमा… बलमा फॅशन का है ये बलमा.”

समोर आलेल्या फोटोत दीपिका ब्लॅक पँटसूट आणि ब्लेजरमध्ये दिसत आहे. तिनं ब्लॅक हाय हिल्सही घातले आहेत. काहींना तिचा लुक आवडला परंतु काहींना हा लुक रुचला नाही असं दिसत आहे. अनेकांनी दीपिकाला कमेंट करत ट्रोल केलं आहे.

एकानं म्हटलं आहे की, अजिबात जमलं नाहीये. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की, कधी कधी कमीच जास्त असतं. तुझी ही डिझॅस्टर फॅशन चॉईस पाहून सध्या मी एवढंच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलून घालणं यात काहच फरक नाहीये.

एकानं तर रणवीर सिंगवरून कमेंट करत म्हटलं आहे की, हा रणवीरचा परिणाम आहे. एकानं तिला बोरिंग म्हटलं.

एक जण म्हणाला, बोरिंग आहे. आणखी एक ब्लॅक. कालही हिनं ब्लॅकच घातलं होतं. ब्लॅक आणि व्हाईट व्यतिरीक्त इतरही कलर आहेत.

 

 

You might also like