दीपिका पादुकोण बनली देशाची नंबर १ फिमेल ब्रँड ; ‘एवढी’ आहे २०१८ ची कमाई !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ही अभिनेत्री सध्या खुप चर्चेत आहे. भारताची सर्वात मोठी सेलिब्रिटी ब्रॅंड दीपिका पादुकोण आहे. आणि तिच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहली याचे नाव घेतले जाते. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्याच्या यादीत दीपिकाची गतवर्षीची कमाई ११३ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. ब्रॅंड व्हॅल्यूच्या बाबतीत दीपिकाने क्रिकेटपटू एमएस धोनी, अभिनेता आमिर खान आणि रणपीर सिंग अशा सगळ्यांना मागे टाकले आहे.

 

अभिनेत्री दीपिकाने वेगवेगळ्या २१ उत्पादनांची ब्रॅंड अॅम्बिसीडर म्हणून काम केले. इतक्या उत्पादनांची जाहिरात करणारा दुसरा कुठलाही फिल्मी अभिनेता व अभिनेत्री नाही. फक्त क्रिकेटपटू विराट कोहली तिच्या जवळपास पोहचू शकतो. वाढत्या ब्रॅंड व्हॅल्यूसोबत दीपिकाने आता स्टार्स अप्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. फर्निचर आणि ब्यूटी प्रॉडक्टसमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दीपिकावे आता ड्रम फूड्स इंटननेशनल प्राइवेट लिमिटेड या सुप्रसिद्ध फ्रेंच कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी एपिगेमिया हा योगर्ट ब्रॅंड चालवते.

 

सेलिब्रिटी ब्रॅंड व्हॅल्यूवर लक्ष ठेवणारी डफ आणि फल्पस या कंपनीची ताजी आकडेवारी बघता, दीपिका पादुकोणची ब्रॅंड, व्हॅल्यू १० कोटी डॉलर म्हणजे ७०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ब्रॅंड व्हॅल्यूच्या बाबतीत दीपिकाने क्रिकेटपटू एमएस धोनी, अभिनेता आमिर खान आणि पती रणवीर सिंगला ही मागे टाकले आहे.

 

सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात खुप व्यस्त आहे. ‘छपाक’ या चित्रपटात ती अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छपाक’ मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे.

www.lokmat.com
/

You might also like