‘हा पदार्थ मी न कंटाळता आयुष्यभर खाऊ शकते’, दीपिका पादुकोणनं सांगितलं

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण सध्या पती रणवीर सिंग सोबत टाईम स्पेंड करत आहे. दीपिका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अलीकडेच केलेल्या लाईव्ह चॅटमध्ये चाहत्यानं तिला विचारलं की, असा कोणता पदार्थ आहे जो रोज तू न कंटाळता रोज आयुष्यभर खाऊ शकते. यावेळी तिनं तिच्या आवडीचा पदार्थ सांगितला आहे.

https://www.instagram.com/p/CARjfQ3jZ-i/

लाईव्ह चॅटमध्ये चाहत्यानं आडीचा पदार्थ विचारल्यानंतर दीपिकानं लगेच उत्तर दिलं की, रसम, पांढरा भात आणि कैरीचं लोणचं. दीपिका तिच्या आवडीचा हा पदार्थ न कंटाळता रोज आयुष्यभर खाऊ शकते.

यावेळी आणखी एकानं तिला विचारलं की, लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वात आधी तू काय करणार आहे. यावर उत्तर देताना दीपिकानं सांगितलं की, सर्वात आधी ती तिच्या आई वडिलांना जाऊन भेटणार आहे. इतरही चाहते तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होते आणि तीही त्यांना उत्तर देत होती.

https://www.instagram.com/p/CAknRR5nkA6/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर छपाक या सिनेमात ती शेवटची दिसली होती. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B-E_rgpD9nH/

https://www.instagram.com/p/B9iyA9UjNP8/

https://www.instagram.com/p/B9ix9kUjrpc/

https://www.instagram.com/p/B9gJgmiD7kG/

https://www.instagram.com/p/B9Y5dnJjLxQ/