Deepika Padukone | हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) संबंधीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके (Heart Rate) वाढल्याने तिची प्रकृती बिघडली. यानंतर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत (Actor Prabhas) तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये (Shooting) व्यस्त आहे.

 

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या (Project K’ Movie) शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. दरम्यान, तिची प्रकृती सेटवर अचानक बिघडल्याने तिला तात्काळ शहरातील कामिनेनी रुग्णालयात (Kamineni Hospital Hyderabad) दाखल करण्यात आले. दीपिकाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

 

 

दीपिका शूटिंगला परतली का?
दुसरीकडे, साऊथच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवणाऱ्या मनोबाला विजयबालन (Manobala Vijayabalan) यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे की, दीपिका आता पूर्णपणे बरी असून प्रोजेक्टच्या शूटिंगला परतली आहे. आतापर्यंत दीपिका किवां दीपिकाच्या पीआर टीमनं असं काहीही सांगितले नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका सध्या आराम करत आहे.

 

दीपिकाचे आगामी चित्रपट
दीपिका आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ मध्ये ती प्रभाससोबत, ‘फायटर’मध्ये (Fighter) हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ‘पठान’ मध्ये (Pathan) शाहरुख खान सोबत (Shah Rukh Khan) दिसणार आहे. ती पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने याआधी शाहरुख खान सोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा चौथा चित्रपट असेल.

 

Web Title :- Deepika Padukone | deepika padukone health update deepika heart rate increases while shooting in hyderabad reaches hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’

 

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

 

Pune Pimpri Crime | पत्नीनेच पतीचा खून केला, दुसऱ्यांदा केलेल्या शवविच्छेदन अहवालातून उघड