Deepika Padukone | दीपिका पादुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वाचे लक्ष; जवानच्या ट्रेलरनंतर झाली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही तिच्या हटके स्टाईल व फॅशनमुळे चाहत्यांना आश्चर्यचकित करते. दीपिकाच्या एअरपोर्ट लूकची (Deepika Padukone Airport Look) सोशल मीडियावर नेहमी वाहवाह होत असते. आज (मंगळवार) देखील दीपिकाला मुंबई एअरपोर्टवर पापाराझींनी स्पॉट केले. ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरनंतर (Jawan Trailer Out) दीपिका एअरपोर्टवर दिसून आली. यावेळी दीपिकाच्या (Deepika Padukone) स्टाईलिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या ‘जवान’ चित्रपटाच्या (Jawan Preveu) ट्रेलर सोशल मीडियावर खूप गाजत आहे. दीपिका मुंबई एअरपोर्टवर तिच्या आलिशान गाडीमधून येताना स्पॉट झाली. यावेळी दीपिकाने जांभळ्या रंगाचे डेनिमचा कॉर्डीनेट सेट परिधान केला होता. यावेळीने लाईट ब्लू कलरच्या टी शर्टने तो स्टाईल केला होता. त्याचबरोबर तिने काळ्या रंगांचे बुट व काळ्या रंगाचा गॉगल घालून लूक पूर्ण केला होता. तसेच दीपिकाने केसांची स्लीक करुन हेअर स्टाईल केली होती. मुंबई एअरपोर्टवर पापाराझींना स्माईल करुन दीपिकाने पोज दिल्या आहेत. तिच्या या कूल एअरपोर्ट लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही यशाच्या शिखरावर आहे. तिचा यावर्षी आलेला ‘पठान’ चित्रपट (Pathan Movie)
बॉक्सऑफिसवर खूप गाजला. यानंतर ती शाहरुख (SRK) सोबत ‘जवान’ चित्रपटात देखील झळकणार आहे.
‘जवान’ मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. ट्रेलरमध्ये दीपिका ॲक्शन सीन करताना दिसली.
याचबरोबर दीपिका पादुकोण हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) ‘फायटर’ (Fighter) चित्रपटात काम करणार आहे.
त्याचबरोबर तिचा बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ (Project K) सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title :  Deepika Padukone | deepika padukone spotted at the airport after showing a glimpse in the prevue of shah rukh khan jawan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा