दीपिका पादुकोणला नको होतं रणवीरसोबत सीरियस रिलेशन ! 13 व्या वर्षीच झाला होता ‘धोका’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहेत. त्यांची बाँडिंग प्रेम त्यांच्या फोटोंमधून नेहमीच व्यक्त होताना दिसतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, एक वेळी अशी होती जेव्हा दीपिका रणवीरबद्दल अजिबात सीरियस नव्हती. तिला कोणतीही कमिटमेंट नको होती. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं या साऱ्याचा खुलासा केला आहे.

दीपिकाला नको होती कोणतीही कमिटमेंट

आपल्या आयुष्यात आधीच खूपदा ब्रेकअपच दु:ख सहन केल्यानं ती खूप त्रासात होती. त्यामुळं तिला परत कोणासोबत मन जोडायची इच्छा नव्हती. रणवीर तिला आवडत होता. परंतु तिला कोणतीही कमिटमेंट नको होती.

‘माझा विश्वास प्रत्येकवेळी तुटत होता’

दीपिकाला एक कॅज्युअल रिलेशन हवं होतं. दीपिका म्हणाली की, “त्याचा काही प्रश्न नव्हता परंतु विषय हा होता की, मी कमिटेड रिलेशनसाठी तयार होते का. कारण याआधी मी अनेकदा रिलेशनशिपमध्ये आले होते. माझा विश्वास प्रत्येकवेळी तुटला आहे.” या सगळ्यामुळं ती खूप वैतागली होती. तिला काही दिवस एकटं रहायचं होतं.

13 व्या वर्षीच आली होती रिलेशनशिपमध्ये

दीपिका तिच्या प्रत्येक नात्यात सीरियस होती. दीपिका म्हणते, “मी कोणालाही असंच कॅज्युअली डेट केलं नव्हतं. मी 13 वर्षांची होते तेव्हाच रिलेशनशिपमध्ये होते. आता माझं लग्न झालं आहे तर मी हे सगळं सांगू शकते. मला रणवीर सिंग भेटल्यानंतर मला नुकताच धोका मिळाला होता. त्यामुळं मला कॅज्युअल डेटींग ट्राय करायचं होतं.”