ऐश्वर्यानंतर दीपिकाचा ‘डुप्लिकेट’; फोटो पाहून व्हाल हैराण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसारखे दिसणाऱ्या अनेकांच्या बातम्या यापूर्वी बऱ्याचदा समोर आल्या होत्या. सोशल मीडिया युजर्स अशा बातम्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूची दाखवतात. याप्रकारचे फोटोही मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींची ‘जुडवा’ समोर आले आहेत. यापूर्वी ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याशी मिळती-जुळती तरुणी दिसली होती. त्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा ‘डुप्लिकेट’ दिसला आहे.

काही सोशल मीडिया युजर्सने नोटीस केले की पाकिस्तानी ऍक्टर फहाद मुस्तफा याचा चेहरा दीपिका पादुकोणशी मिळता-जुळता आहे. फहादचा दीपिका पादुकोणसोबत कोलाज केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये या दोन्ही चेहऱ्यांमध्ये अगदी किरकोळ फरक दिसला आहे. सोशल मीडियावर या फोटो शेअर करणाऱ्या युजर्सचे म्हणणे आहे, की फहादच्या चेहऱ्यावरून दाढी काढली तर तो दीपिका पादुकोणसारखा दिसेल. एका युजर्सने दीपिकाशी मिळता जुळता फोटो शेअर करत म्हणाला, की ‘प्लीज इसे हटा दो, हे पाहून मी आणि माझी मुलगी डिस्टर्ब होत आहे.

दाढीविना फहाद दिसतो दीपिका
एका युजरने लिहिले, की फहाद मुस्तफा हा खऱ्या अर्थाने दाढीसह दीपिका पादुकोण आहे आणि तुम्ही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अनेक युजर्सने शेअर करत लिहिले, की दीपिकाला पाहिल्यानंतर फहादचा चेहरा इमॅजिन करतो. दीपिका लवकरच फिल्म 63 मध्ये दिसणार आहे.