दीपिकाचे इन्स्टाग्रामवर झाले 5 कोटी फॉलोअर्स !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. तिचा केवळ देशातच नाही, तर विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका सोशल मीडियावर सक्रीय असते. विशेष म्हणजे दिवसेंदिवस दीपिकाच्या चाहत्यांची संख्या वाढत असून नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.

दीपिकाने इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत तिचे 5 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तिने त्याचा फॅन क्लबचेही आभार मानले आहेत. दरम्यान, दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सध्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले आहे. मात्र या काळातही दीपिका घरी राहून तिच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यात वेळ घालवत आहे.