ऐश्वर्या रॉयच्या कान्स लुकवर प्रतिक्रिया देत दीपिका पादुकोण म्हणाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कान्स फिल्म फेस्टीवल 2019 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आपल्या फॅशनेबल अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कंगना रणौत दीपिका पादुकोण, डायना पेंटी, हुमा कुरेशी यासोबतच ऐश्वर्या रॉय यांचा लुक टॉप ट्रेंड मध्ये आहे. कान्स फेस्टीवल अटेंड करायला ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्यालाही सोबत आणले होते. कान्सच्या रेड कारपेटवर ऐश्वर्याने पहिल्या दिवशी मेटॅलिक गोल्डन येलो गाऊन परिधान केला होता. अभिनेत्रींच्या या लुकमुळे सर्वच प्रभावित झाले.

View this post on Instagram

💖My Sunshine Forever☀️🌈✨ 💖LOVE YOU ❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

डीवा ऐश्वर्या रॉयचा हा रेड कारपेट लुक दीपिका पादुकोणला खूपच आवडल्याचे दिसत आहे. इंस्टाग्रामवर दीपिकाने ऐश्वर्याच्या फोटोवर कमेंट केली. आपल्या कमेंटमध्ये दीपिकाने म्हटले होते की, “That face!!!” प्रत्येक वर्षी कान्स फेस्टीवलमध्ये ऐश्वर्याच्या लुकबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. प्रत्येक वर्षासारखं यावर्षीही ऐश्वर्याच्या स्टनिंग लुकची चर्चा होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

पहिल्या दिवशी रेड कारपेटवर ऐश्वर्याने गोल्डन मर्मेड कलरचा डीप नेक ट्रेंच गाऊन परिधान केला होता. वन साईडेड फुल स्लीव्ह असलेल्या या गाऊमध्ये ऐश्वर्या डिफरेंट दिसत होती. ओपन हेअर आणि मिनिमल मेकअपमध्ये ऐश्वर्या खूपच ग्लॅमरस दिसत होती. ऐश्वर्याने आपल्या लुकला पर्फेक्ट बनवण्यासाठी खास ज्वेलरीही वापरली होती. अभिनेत्रींचे आफ्टर पार्टी लुकही स्टनिंग दिसत होते.

दुसऱ्या दिवशी कान्सच्या रेड कारपेटवर ऐश्वर्याने व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता. या व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या एखाद्या एंजलसारखी दिसत होती.

Loading...
You might also like