दीपिका पादुकोणचा कारचा पाठलाग करण्यावरून फोटोग्राफर्स सोबत वाद ! दिली लीगल अ‍ॅक्शनची ‘धमकी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही घराबाहेर पडली असता तिच्या कारचा पाठलाग करणाऱ्या पेपराजीसोबत (Paparazzi -Photographers) तिची बाचाबाची झाल्याचं समजत आहे. असंही समजत आहे की, तिच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) देखील होती.

एका इंग्रजी वृत्तानुसार, दीपिका पादुकोण नुकतीच धर्मा प्रॉडक्शनच्या (Dharma Productions) जुन्या ऑफिसजवळ आढळून आली होती. तिथच तिनं पेपराजीला खडेबोल सुनावल्याचं समजत आहे. रिपोर्टनुसार दीपिका सोबत अनन्या पांडेही होती. दोघींचे अनेक फोटो क्लिक केल्यानंतरही फोटोग्राफर्स तिच्या कारचा पाठलाग करत होते.

दीपिकाच्या बॉडीगार्डसोबत वाद

दीपिकाचा फोटोग्राफर्ससोबत वाद झाल्यानंतर तिचे बॉडीगार्ड्स बाहेर आले आणि त्यांचाही फोटोग्राफर्ससोबत वाद झाला. इतकंच नाही तर तिनं त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तिनं फोटोग्राफर्सला लीगल अॅक्शन घेण्याचीही धमकी दिल्याचं समजत आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.