83 : दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक OUT, कपिल देवच्या पत्नीच्या भुमिकेत दिसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लवकरच 83 या सिनेमात दिसणार आहे. रणवीर सिंगनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे तर दीपिकानं त्यांची पत्नी रोमी भाटीयाची भूमिका साकारली आहे. दोघांचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

83 मध्ये कसा असेल दीपिकाचा लुक ?
दीपिकानं इंस्टावरून आपला 83 सिनेमातील लुक शेअर केला आहे. यात रणवीरही दिसत आहे. रणवीर कपिल देव आणि दीपिका रोमी यांच्या रोलमध्ये दिसत आहे. दीपिकाच्या लुकबद्दल बोलायंच झालं तर आतापर्यंतच्या सिनेमापेक्षा तिचा या सिनेमातील लुक खूपच वेगळा आहे. फोटोत दोघांची छान केमिस्ट्री दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8u7p-ajVLO/?utm_source=ig_embed

आपल्या रोलविषयी सांगताना दीपिका म्हणते, “खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एका सिनेमात लहान परंतु महत्त्वाचा रोल साकारत सिनेमाचा हिस्सा बनणं सन्मानाची बाब आहे. एका पतीच्या स्वप्नांच्या यशात पत्नी किती महत्त्वाचा रोल साकारते हे मी माझ्या आईमध्ये खूपच जवळून पाहिलं आहे. ज्या महिला आपल्या पतीच्या स्वप्नांना आपल्या आधी ठेवतात अशा महिलांना माझा 83 सिनेमा मी समर्पित करते.” दीपिकाचा रोल छोटा असला तरी दमदार आहे यात शंका नाही.

कबीर खान दिग्दर्शित 83 सिनेमातील रणवीर-दीपिकाचा लुक समोर आल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दीपिका या सिनेमाची निर्मातीदेखील आहे. निर्माती म्हणून छपाकनंतर हा दीपिकाचा दुसरा सिनेमा आहे. ज्यात तिनं कामही केलं आहे.

चाहत्यांना सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे. भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा कपिल देव यांच्या कप्तानीमध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू अशा अनेक भाषेत रिलीज केला जाणार आहे.