अखेर भारतीय नागरिकत्त्वाबाबत दीपिकाने दिले प्रत्युत्तर ; म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दीपिका पादुकोणच्या भारतातील नागरिकत्वाला घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न उठताना दिसत आहेत. असं सांगितलं जात आहे की, तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही असेही बोलले जात आहे. याबाबत दीपिकाने मात्र मौन धारण केले होते. परंतु सोमवारी (दि 29 एप्रिल) रोजी तिने मतदान केल्यानंतर मात्र या सर्व प्रश्नांना दीपिकाने ट्विट करत प्रतयुत्तर दिले आहे.

दीपिका पादुकोणने मतदान केल्यानंतर ट्विटरवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, “मी कोण आहे आणि मी कुठून आले आहे याबाबत मला काहीही शंका नाही. ज्यांना माझ्याबद्दल कन्फ्युजन आहे त्यांनी कृपया कन्फ्युज होऊ नका. जय हिंद !”

https://twitter.com/deepikapadukone/status/1122823452904214528

सध्या दीपिकाचे हे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकारांबाबत भारताचा नागरिक असण्याबाबत बोलले जाताना दिसत आहे. त्यात दीपिका पादुकोणचेही नाव आहे. यावर दीपिकाने भाष्य केले आहे. शिवाय मतदानाचे कर्तव्यही पार पाडले आहे. लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 17 मतदारसंघामध्ये निवडणूक झाली. यावेळी बॉलिवूड स्टार सलमान खान, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग यासोबतच इतर अनेक कलाकारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला.