खरंच ! ‘महाभारत’च्या द्रौपदीची भूमिका साकारणार दीपिका पादुकोण, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला ‘महाभारत’ हा चित्रपट बनवायचा आहे. या चित्रपटात ती द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्माता मधु मंटेना यांच्यासोबत दीपिका हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच दीपिका पादुकोण ‘महाभारत’ चित्रपटाविषयी बोलली आहे.

दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहे ती म्हणाली की ‘हो, मी हा चित्रपट बनत आहे.’ या चित्रपटाविषयी चर्चा करताना दीपिका पादुकोण पुढे म्हणाली की, ‘हा प्रकल्प कोणत्याही सामान्य प्रकल्पासारखा होणार नाही. त्यामागे एक मोठी टीम आहे आणि ही संपूर्ण टीम सध्या खूप मेहनत घेत आहे.’

या मुलाखतीत दीपिका पादुकोणने आणखी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. ती म्हणाली, ‘मी त्या लोकांसारखी बिलकुल नाही जे प्रोजेक्टच्या घोषणेसोबत बजेट क्रिएट करण्यावर विश्वास ठेवतात. मी हा प्रोजेक्ट बनवण्याआधी खूप विचार केला आहे.’

दीपिका पुढे म्हणाली, ‘पूर्वी मी छपाकच्या प्रमोशनमध्ये बर्‍यापैकी व्यस्त होते. यामुळे मला या चित्रपटावर बोलण्यास वेळ मिळाला नाही. आम्ही भलेही चित्रपटाची सुरूवात केली असेल पण कलाकार विषयी काही निश्चित झालेले नाही. ‘महाभारत’ ही एक कल्पना आहे आणि आपण ती सामान्य चित्रपटासारखी बनवू शकत नाही. या चित्रपटामध्ये निर्मितीपासून बजेटपर्यंत आणि पोशाखांपर्यंत काम केले पाहिजे. ही मेहनत पाचपट अधिक असेल. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.’

तिच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे म्हणले तर दीपिका पादुकोण लवकरच तिचा पती रणवीर सिंगसोबत ’83’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.