Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूडची ‘मस्तानी’, ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. दीपिका तिच्या अभिनयाबरोबरच लूकमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. आता या अभिनेत्रीचा ऑस्कर 2023 च्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत दीपिकाचे नाव समावेश झाल्याने ती आता ऑस्कर 2023 मध्ये भारताचे नाव उंचवताना दिसणार आहे. दीपिकाने (Deepika Padukone) पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. या सोहळ्यात होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. ही माहिती कळताच दीपिकावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. याआधी देखील दीपिकांनी अनेक अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता. दीपकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दीपकाने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

 

दीपिकाने (Deepika Padukone) शेअर केलेल्या पोस्टवर सध्या कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
अनेक चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.
दीपिकाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘फायटर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याच सोबत दीपिका ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आता ऑस्कर 2023 मध्ये दीपिका पादुकोणकडे मोठी जबाबदारी असल्याने चाहते त्याचबरोबर कलाकार आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title :- Deepika Padukone | oscars 2023 deepika padukone will present an award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

Ravindra Dhangekar | आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट, बापटांनी दिला ‘हा’ कानमंत्र (व्हिडिओ)

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…;
राज्यात असं वारंवार घडतयच कसं, सरकार काय झोपलय का ?