Deepika Padukone-Pathan Song | पठाण चित्रपटातील गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून नवा वाद सुरु; हिंदू महासभेने दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन : Deepika Padukone-Pathan Song | दिवसेंदिवस अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर तो वादात होता. तर दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर ते देखील वाद्याच्या भोवऱ्यात अडकले आहे. या गाण्यात दीपिकाने अश्लील नृत्य केल्यामुळे यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. बायकॉट पठाण हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चालू आहे. तर आता या गाण्यात दीपिका ने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून आक्षेप घेण्यात येत आहे. (Deepika Padukone-Pathan Song)

दीपिकाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंतच्या सिनेमांपैकी या सिनेमांमध्ये सर्वाधिक बोल्ड सीन दिल्याचे म्हटले जात आहे. तर यामुळे देखील दीपिका सध्या ट्रोल होत आहे. या गाण्यांमध्ये दीपिका ने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तिच्या या ड्रेसवर हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी आक्षेप नोंदवला आहे. तिने घातलेल्या कपड्यांचा रंग भगवा असल्याने त्यांनी तिच्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर या सिनेमात भगव्या रंगाचा अपमान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Deepika Padukone-Pathan Song)

पुढे बोलताना ते म्हणाले की, “बॉलीवूड सध्या सनातन धर्मा विरोधात काम करत आहे. या गाण्यात दीपिकाला भगव्या रंगाचे कपडे देण्यात आले. तर शाहरुखला हिरव्या रंगाचे कपडे देण्यात आले. भगवा रंगाने देशाला आणि जगाला दिशा दिली आहे. त्याचा अशा पद्धतीचा अपमान आम्ही सहन करणार नाही”. तर या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी ही चक्रपाणी महाराजांनी हिंदू समाजाला केली आहे. चक्रपाणी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही या गाण्याचा विरोध केला आहे. तर आता येणाऱ्या काळात हा वाद अजूनच वाढत जाईल का? आणि पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार की नाही? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहे.

Web Title :- Deepika Padukone-Pathan Song | deepika padukone wearing saffron color dress in besharam song pathan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार