रणवीर आणि दीपिकाचं वऱ्हाड निघालं इटलीला 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधान आले असून सिने जगतात दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असल्याचे बोलले जाते आहे. दीपिका आणि रणवीर यांनी विवाह सोहळा इटलीला करण्याचे अगोदरच जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी आज इटलीकडे प्रस्थान केले आहे . विमानतळावर त्याच्या चाहत्यांचा जनसागरच त्यांना इटलीला जाण्यासाठी निरोप द्यायला अवतरला होता.  दीपिका आणि रणवीर यांनी  आपल्या सोशल मीडियावरील खात्यावरून त्यांचे  विमानतळावरील फोटो प्रदर्शित केले आहेत. विराट कोहली यांच्या लग्न सोहळा नंतर विदेशात लग्न करण्याची चढाओढच सेलेब्रिटी जगतात पाहण्यात मिळते आहे. रणवीर आणि दीपिका यांना बॉलीवूड मधील सर्वात सुंदर जोडपे मानले जाते आहे म्हणून त्यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.

असा होणार रणवीर आणि दीपिकाचा  विवाह सोहळा

  १४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका हि कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. रणवीर सिंग हा सिंधी असल्याने  १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे. इटलीत लेक कोमो येथे दोघ लग्न करणार आहेत . २१ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये तर एक डिसेंबर रोजी मुंबईत  त्या दोघांचा मायदेशी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांनी त्यादिवशी सर्व मित्रांना आणि आप्तजणांना स्नेहभोजनाचे आयोजन केले  आहे.

दीपिका आणि रणवीर यांना निरोप द्याला आज विमानतळावर त्यांच्या परिवारातील काही लोक उपस्थित होते. १५ तारखेचा विवाह संपन्न झाल्या नंतर लग्नाला जमलेले पाहुणे मायदेशी परतणार असून त्यानंतर २१ तारखेला दीपिका आणि रणवीर  बेंगळुरूमध्ये येणार असल्याचे  बोलले जाते आहे.दरम्यानच्या काळात दोघे इटलीमध्ये एकांतात राहणार आहेत असे सांगण्यात येते आहे. एकंदरच रणवीर आणि दीपिकाच्या लग्न सोहळ्याबद्दल खूपच चर्चा रंगत असल्याचे समोर येते आहे.