‘छपाक’ नंतर आता दीपिकाच्या जाहिरातींना ‘बॉयकॉट’, #दीपिका हटवा LUX वाचवा होतोय ‘ट्रेंड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेली होती. त्यामुळे सर्व ठिकाणी खळबळ उडाली होती. यानंतर दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’ वर बहिष्कार टाकण्याची भाषा केली गेली. सोशल मीडियावर दीपिकावर खूप टीका देखील करण्यात आली. या टीकेचा फटका नक्कीच चित्रपटाला बसला. आता दीपिकाच्या जाहिरातींनाही फटका बसत आहे. ज्या जाहिरातींमध्ये दीपिका आहे, त्या जाहिराती दाखविण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.

दीपिका ब्रिटानिया गुडडे, लॉरिलयल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स आणि अ‍ॅक्सिस बँकेसह 23 विविध ब्रँडसाठी जाहिराती करते. या जाहिरातीतून ती सुमारे 103 कोटीची कमाई करते. एका चित्रपटासाठी दीपिका 10 कोटी रुपये घेते. तर जाहिरातीसाठी 8 कोटी घेते. मात्र जेएनयूच्या संपुर्ण घटनेमुळे काही ब्रॅंड्सनी तिच्या जाहिरातींचे प्रमाण कमी केले आहे. अद्याप कुठल्याही ब्रॅंडने तिच्यासोबतचा जाहिरातींचा करार रद्द करण्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही.

एका कंपनी एक्झिक्युटीवने सांगितले की, दीपिकाच्या जाहिराती दोन आठवडे थांबवण्यासाठी आम्हाला एका ब्रॅंडने सांगितले आहे. तोपर्यंत वाद निवळेल अशी आशा त्यांना आहे.

मोठे ब्रॅंड कुठल्याही वादात पडू इच्छित नाही. त्यामुळे येत्या काळात जाहिरातींच्या करारामध्ये काही नियम किंवा अटी वाढवल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. जाहिरातीत काम करणाऱ्या सेलिब्रेटींची राजकीय भूमिका वा प्रशासनाचा रोष ओढवेल अशा कृतीबद्दलचे काही नियम जाहिरातींच्या करारामध्ये घालून देण्यात येणार असल्याचे कळतेय. जेणेकरुन सेलिब्रिटींच्या राजकीय भूमिकेचा किंवा कृतीचा फटका संबंधित ब्रॅंडला बसणार नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like