अभिनेत्री दीपिकानं सांगितलं ‘सिक्रेट’ ! पती रणवीर आणि ‘Ex’ बॉयफ्रेंड रणबीरमधील मोठा फरक ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुंदर अदाकारा दीपिका पादुकोण सध्या आपला पती रणवीर सिंगसोबत खुश आहे. रणवीरसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका अनेकांना डेट करण्याला घेऊन चर्चेत आली आहे. यातील एक अभिनेता रणबीर कपूर आहे. अनेक इव्हेंटमध्ये दीपिकाला रणबीरबाबत प्रश्न विचारले जातात ज्याची ती बिंधास्त उत्तरे देत असते.

Deepika Padukone

नुकतीच दीपिका मामी फिल्म फेस्टीव्हलला पोहोचली होती. यावेळी तिला विचारण्यात आलं की, रणवीर सिंग आणि रणबीर कपूर दोघंही आपल्या भूमिकेला आणि अभिनयाला घेऊन कसं काम करतात? दीपिकाने वेगवेगळ्या अंदाजात उत्तर दिलं.

दीपिका म्हणाली, “आपली भूमिका साकारण्याच्या संदर्भात रणवीर आणि रणबीर एकदम वेगळे आहेत. रणवीर पूर्ण प्रोसेसमध्ये विश्वास ठेवतो. रणवीर आपल्या खासगी आयुष्यातही ते पात्र अंगीकारतो. सेटवरही त्याची वर्तणूक तशीच असते. तो आपल्या भूमिकेप्रमाणेच सर्वांशी बोलतो.”

रणबीर कपूरविषयी बोलताना दीपिका म्हणाली, “रणबीर जास्त तयारी करताना मला कधीच नाही दिसला. परंतु तो जेव्हा आपला सीन करतो तो चांगलाच असतो. रणबीर आणि माझी भूमिकेची तयारी करण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे.”

Deepika Padukone, Ranbir Kapoor

दीपिका पुढे म्हणते, “जेव्हा आम्ही घरी एकत्र असतो तेव्हा मी कामाचं काहीच बोलत नाही. परंतु रणवीर मात्र काहीही करून कामाबद्दल बोलतोच. मी त्याच्यापासून कधीच बोर नाही होतं.” असेही ती म्हणाली.

View this post on Instagram

🕹

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like