Video : दीपिका पादुकोणनं शेअर केला फनी व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशलवर कायमच ॲक्टीव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. कधी कधी तिचा बोल्ड किंवा ग्लॅमरस अवतारही पाहायला मिळतो. तिनं अनेकदा बोल्ड बिकिनी लुकमधील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आपल्या एका व्हिडीओमुळं सध्या ती चर्चेत आली आहे.

दीपिकानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती गरबा डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, तिचा हा व्हिडीओ किचनमधील आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

दीपिकाच हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांची तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत. शाहरुखच्या पठाण सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर हृतिक रोशन सोबत ती फायटर सिनेमातही झळकणार आहे.