छपाक सिनेमाचा ‘तो’ सीन शूट करताना दीपिकाला कोसळलं ‘रडू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरत मेघना गुलजार यांच्या छपाक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाईवर लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमात दीपिका विक्रांत मेसी सोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या टीमने आपलं पहिलं शुटींग शेड्युल नवी दिल्ली येथे समाप्त केलं आहे.

तुम्हाला आणखी एक खास बात सांगू इच्छितो की, दीपिका पादुकोण निर्माती म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करत आहे. नक्कीच छपाक एक इमोशनल सिनेमा असणार आहे हे मात्र नक्की. सिनेमाची कथा लक्षात घेता ही गोष्ट सहज लक्षातही येते. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षक तर इमोशनल होतीलच परंतु खुद्द दीपिका या सिनेमाची शुटींग करताना इमोशनल झाल्याचे दिसून आले. अक्षरश: दीपिका रडताना दिसून आली.

खास बात अशी आहे की, स्टोरी लाईनवरूनच हे लक्षात येतं की, या सिनेमात तुम्हाला इमोशनल करणारे अनेक सीन असणार आहेत. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी फिल्म मेकरसोबत या सिनेमातील सीनबाबत चर्चा करताना दीपिका पादुकोणला रडू कोसळलं होतं. त्यानंतर तिने स्वत:ला सांभाळलं आणि शुटींग सुरु केली. दीपिका आणि विक्रांत यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loading...
You might also like