दीपिका पादुकोणने शेअर केला रणवीर सिंहच्या ‘बर्थडे केक’चा फोटो, लिहीलं सर्व काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंगने ६ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला. सध्या रणवीर सिंग लंडनध्ये आपला आगामी सिनेमा ८३ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रणवीर सोबत पत्नी दीपिका पादुकोणही आहे. लंडनमध्येच रणवीरने आपला स्पेशल डे साजरा केला.

दीपिकाने रणवीर सिंगच्या केकचा फोटो सोशलवर शेअर केला आहे. सध्या हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले की, “Sometimes,you can have your cake & eat it too!!! #BirthdayBoysBirthdayCake”

https://www.instagram.com/p/BzqnA5sATfA/?utm_source=ig_embed

याआधी रणवीरने सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा फोटो शेअर केला होता. इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोत दिसत होतं की, दीपिका रिलॅक्स करत बसली आहे, सुंदर नजारे पहात आनंद घेत आहे. रणवीरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते, “हाई ऑन केक.” हॅशटॅग देत असंही म्हटलं होतं की, “हॅप्पी बर्थडे फॉर मी.” दोघेही कलाकार पर्सनल आणि प्रोफेशनलवर शानदार बाँडिंग शेअर करताना दिसतात. रणवीरचा हा फोटोही व्हायरल झाला होता.

आगामी सिनेमा 83 विषयी…

83 या सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, याचे दिग्दर्शन कबीर सिंह करत आहेत. १९८३ साली भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला होता. त्याची ही गोष्ट आहे. रणवीर या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत आहे तर दीपिका त्यांच्या पत्नीचा रोल करत आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत रणवीरने या सिनेमातील आपला फर्स्ट लुक शेअर केला होता. कपिल देवच्या भूमिकेतील रणवीर सिंग चाहत्यांना भावला आहे.

या सिनेमात दीपिका आणि रणवीर केले एकत्र काम

दीपिका आणि रणवीरने याआधी गोलियों की रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. आता ८३ या सिनेमात दोघेही पुन्हा एकत्र दिसणार आहेत. २०१८ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. ८३ सिनेमातही दोघांनीही पती पत्नीचाच रोल साकारला आहे.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान