ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यावर दीपिकानं घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टीनं वेधलं लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत संवाद साधत असतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशन पासून ते स्वत:च्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपल्या आयुष्यातील सुख दु:खाचे क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इन्साग्राम हे अनेक सेलिब्रिटींचे आवडते आहे. या ठिकाणी ते आपले फोटो, व्हिडीओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात.

View this post on Instagram

what a Slayage it was 🔥😳 • #deepikapadukone

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

View this post on Instagram

#NewProfilePic

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणचेही सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलिब्रिटीचा पुरस्कारही दीपिकाला मिळाला होता. फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी खूप खूप आभारी आहे, अशा शब्दांत दीपिकाने पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या वर्षात मी आणखी बऱ्याच गोष्टी, घडामोडी इन्स्टाग्रामद्वारे मी शेअर करणार असल्याचेही दीपिकाने म्हटले होते. सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारी दीपीकाने आता मात्र आता एक वेगळाच निर्णय घेतला आहे. दीपिकाने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आता तिचे दर्शन घडणार नाही.

View this post on Instagram

WOW !! 😍 @deepikapadukone

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

View this post on Instagram

WOW !! 😍 @deepikapadukone

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

सुशांत प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. 2017 च्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दीपिकाने ‘हॅश’ (हशिश) आणि माल है क्या ? सारख्या ओळी लिहिल्या होत्या, ती या ग्रुपची स्वत: अ‍ॅडमिन असल्याचे उघड झाले होते.

ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दिपिकाने स्वत:ला सध्या सोशल मीडियापासून लांब ठेवले आहे. तिने गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचे शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आले होते. त्यामुळे ती शूटींग सोडून मुंबईला परतली होती. आता पुन्हा एकदा दीपिकाने सिनेमाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. सध्या ती गोव्यातच आहे.

You might also like