‘या’ टॉपच्या २ अभिनेत्रींनी देखील केलं होतं दीपिका सारखं ‘काम’, मिळाला होता ‘नॅशनल अवॉर्ड’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या दीपिका पादुकोण आपल्या करियर मध्ये असे चित्रपट निवडत आहे ज्याने तिला एक वेगळीच ओळख मिळणार आहे. दीपिका आता छपाक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ऍसिड हल्ल्यानंतर कशा प्रकारे लक्ष्मी अग्रवाल जीवन जगत आहे यावर आधारित आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला दीपिका आपल्या आयुष्यात खूप खास मानते. बॉलिवूड मध्ये मुख्यतः अभिनेता हा प्रमुख भूमिकेत असतो पण असेही चित्रपट आहेत ज्यात अभिनेत्रीनीं प्रमुख भूमिका बजावली आणि हे चित्रपट महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहेत.

क्वीन
कॉमेडी- ड्रामा म्हणून चर्चेत असलेला चित्रपट क्वीनमुळे कंगना रनौतला एक वेगळीच ओळख दिली आहे. कंगना या चित्रपटात राणीच्या भूमिकेत दिसते. लग्नाच्या दोन दिवसाआधीच नवरदेव लग्नासाठी नकार देतो पण हिम्मत न हारता ती एकटीच हनीमूनसाठी पॅरेसला निघून जाते. यादरम्यान एक घाबरणारी मुलगी कशा पद्धतीने आत्मविश्वासू बनते हे दाखवले आहे. या चित्रपटासाठी कंगना रनौतला बेस्ट अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

कहानी 
सुजॉय घोष दिग्दर्शित कहानी चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटात विद्या  बालन ने विद्या बागची  भूमिका साकारली होती. ज्यात ती लंडनहून कोलकत्याला आपला पती अर्णब बागच्या शोधात येते, जो दोन महिन्यांपासून बेपत्ता असतो.

सीक्रेट सुपरस्टार
सीक्रेट सुपरस्टार चित्रपट एका १४ वर्षाच्या मुस्लिम मुलीवर आधारित आहे. इनसिया या भूमीतेक असणाऱ्या या मुलीला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबतच समाजाशीही झुंझ द्यावी लागते. अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

तुम्हारी सुलु
चित्रपट तुम्हारी सुलु मध्ये विद्या बालन ने एक गृहिणीची भूमिका साकारली जी पुढे जाऊन रेडिओ जॉकी बनते. सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला फिल्म फेयर अवॉर्ड मध्ये ९ नामांकन मिळाले. तर विद्या बालनला बेस्ट एक्ट्रेस अवॉर्डही मिळाला.

मॉम 
सस्पेंस थ्रिलर चित्रपट मॉम मध्ये श्रीदेवीने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटात  तिच्या मुली सोबत वर्गमित्र आणि इतर काही लोक मिळून बलात्कार करतात. काही पुरावे नसल्याने ते सगळे शिक्षेपासून वाचतात. कशा प्रकारे एक आई सगळ्या आरोपींना शिक्षा देते या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटासाठी श्रीदेवीला बेस्ट एक्ट्रेस नेशनल अवॉर्ड मिळाला होता.

 

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ