83 सिनेमाबद्दल केलेलं ट्विट दीपिकाला पडलं ‘महागात’, लोक म्हणाले- ‘शाहिन बागेत जा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणनं आगामी सिनेमा 83 ला घेऊन केलेल्या एका ट्विटमुळे ती टीकेची धनी झाली आहे. ट्विटमध्ये तिनं आपल्या भूमिकेविषयी लिहिलं आहे. दीपिकानं 19 फेब्रुवारी रोजी आपली भूमिका रोमी देवीबद्दल ट्विट केलं होतं. तिनं लिहिलेली पोस्ट बहुतेक नेटकऱ्यांना खटकली आहे.

दीपिकानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “खेळाच्या इतिहासातील प्रतिष्ठीत क्षणांपैकी एका क्षणावर बनणाऱ्या सिनेमात लहान पण महत्त्वाची भूमिका साकारणं ही सन्मानाची बाब आहे.

पुढे आपल्या ट्विटमध्ये दीपिका म्हणते, “एका पतीच्या स्वप्नांच्या यशात पत्नी किती महत्त्वाचा रोल साकारते हे मी माझ्या आईमध्ये खूपच जवळून पाहिलं आहे. ज्या महिला आपल्या पतीच्या स्वप्नांना आपल्या आधी ठेवतात अशा महिलांना माझा 83 सिनेमा मी समर्पित करते.”

दीपिकाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. एकानं तिला ट्रोल करताना म्हटलं आहे की, फक्त सिनेमा प्रमोट करण्यासाठी मागास विचारांना प्रोत्साहन देणं किती दु:खदायक आहे.

आणखी एकानं कमेंट केली आहे की, हे भगवान. आता जे सुरुवातीपासून सुरू आहे ते थांबवण्याची वेळ आली आहे.

दुसऱ्या एका युजरनं दीपिकाच्या ट्विटवर कमेंट केली आहे की, तू तुझ्या पतीच्या करिअरला पुढे नेण्यासाठी आपलं करिअर मागे सोडशील का ?

एकानं तर तिला छपाकवरून टोमना मारला आहे. युजरनं म्हटलं आहे की, या सिनेमाचाही छपाक करायचा आहे वाटतं. एकानं तर तिला शाहिनबागेत जा असंही म्हटलं आहे.

83 सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा कपिल देव यांच्या कप्तानीमध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू अशा अनेक भाषेत रिलीज केला जाणार आहे.

You might also like