Deepika Padukone Viral Video | दीपिका पादुकोणनं बिना पॅन्टचा शेअर केला बोल्ड व्हिडिओ, अदा पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच डिजिटल (Deepika Padukone Viral Video) जगात पदार्पण करणार आहे. दीपिका पादुकोण नेहमी सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. सध्या दीपिका आपला आगामी चित्रपट ‘गहराइया’ (Gehraiyaan) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर तिचा हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 11 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. प्रमोशनच्या वेळी दीपिकाच्या हटके लूकनं (Deepika Padukone Viral Video) सोशल मीडियावर चांगलीच आग लावली.

 

दीपिका पादुकोण ‘गहराइया’ या चित्रपटाच्या प्रमोशनला गेली असता, तिचे चाहते तिला पाहून थक्क झाले. प्रमोशनदरम्यान तिनं इतका बोल्ड आणि हॉट ड्रेस घातला होता की, चाहत्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली. दरम्यान तिच्या लूकमुळे तिला ट्रॉलर्सचा देखील सामना करावा लागत आहे. तसेच हटके लूकमुळे सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या तुफान चर्चेत आली आहे. या लुकमधील तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Deepika Padukone Viral Video) झाला आहे.

 

अलीकडे दीपिका आपल्या आगामी चित्रपट ‘गहराइया’च्या प्रमोशन इवेंटमध्ये पोहोचली. यामध्ये दीपिकानं ब्लॅक ॲण्ड व्हाइट रंगाचा कोट परिधान केला होता. त्याच बरोबर खाली फक्त थाई हाई शूज घातले होते. तिच्या शूजनं तिचा हा लूक पूर्ण केला होता. तर दीपिकानं केसांची वेणी घातली असून, सोबतच नॉर्मल असा मेक-अप केला होता. मात्र या लूकमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओमुळं तिला ट्रोल करायला चालू केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये तिच्या हेअर स्टाईलची मजा उडवत लिहिलं की, ‘खूप खराब हेअर स्टाईल आहे.’ तर दुसऱ्याने लिहिलं की. ‘एवढे पैसे कमवून काय फायदा जर पॅन्ट घातली नाहीये.’ तर एक युजरनं चक्क कमेंटमध्ये लिहिलं की, ‘कोटच्या खाली पॅन्ट घालायला विसरलीस.’ मात्र दीपिकाच्या या फोटोंने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, अनेक नेटकऱ्यांसोबत कलाकारांनी कमेंट्स आणि लाईक्सचा प्रचंड वर्षाव केला आहे.

 

 

 

Web Title :- Deepika Padukone Viral Video | deepika padukone wears only coat on gehraiyaan promotion watch video
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office IVR Service | जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असेल एखादे अकाऊंट, तर ‘हा’ नंबर तुमच्या मोबाइलमध्ये आवश्यक करा सेव्ह; जाणून घ्या

 

Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

 

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या