‘छपाक’मधील दीपिकाचा फर्स्ट लूक व्हायरल ; ‘अशी’ दिसतेय दीपिका पादुकोण

मुंबई : वृत्तसंस्था – ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालचा संघर्ष दीपिका पदुकोण ‘छपाक’ या बायोपिकमधून मांडणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. दीपिकानं ट्विट करत हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ‘ही अशी भूमिका आहे जी कायम माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहणार आहे. आजपासून ‘छपाक’च्या चित्रीकरणाला आम्ही सुरुवात करत आहोत. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’ असं तिनं फोटो शेअर करताना लिहिलं आहे.

‘छपाक’ या चित्रपटात ॲसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला ॲसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर दीपिकाचा ॲसिड हल्ल्यानंतरच्या लूकमधला फोटो दिसत आहे. या फोटोत दीपिकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि आशा अशा मिश्र भावना दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे, ‘छपाक’मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. होळीच्या दिवसापासून दीपिकाने दिल्लीतून या सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. ‘छपाक’मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करतायेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे.

You might also like