दीपिका पादुकोणनं शेअर केला कारमधील ‘तो’ सेल्फी, नेटकऱ्यांनी केल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यावेळी दीपिका चर्चेचा हिस्सा बनण्याचं कारण म्हणजे तिनं घेतलेला कारमधील सेल्फी आहे. एक दिवसापूर्वीच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती यावेळी तिनं ब्लॅक आऊटफिट कॅरी केला होता. प्रवासातून परत येताना तिनं कारमध्ये एक सेल्फी काढला होता ज्याची सध्या सोशलवर चर्चा होताना दिसत आहे.

दीपिका पादुकोणनं कारमध्ये जो सेल्फी काढला होता ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. दीपिकानं हा फोटो उन्हाच्या शेडमध्ये काढला होता. यामुळे तिचे डोळे तपकिरी दिसत होते. याशिवाय दीपिकाचा रंगही जास्त गोरा दिसत होता. तसं तर ती थोडी कमीच गोरी आहे. अनेकांनी दीपिकाच्या फोटोवर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट
केल्या आहेत.

एकानं युजरनं म्हटलं आहे की, अरे ही एवढी गोरी कशी झाली ? एकानं तर असंही म्हटलं की, हिचा सावळा रंग एवढा गोरा कसा झाला ? सध्या दीपिकाचा हे नॅचरल फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.