दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र 

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर रणबीर दीपिकाचे ब्रेकअप झाले. एकेकाळी बॉलिवूडचे हॉट अँड स्वीट कपल म्हणून दोघं ओळखले जायचे. ब्रेकअप झाल्यानंतरही दोघांनी ये जवानी है दिवानी (२०१२), तमाशा (२०१५) मध्ये सोबत कामही केलं. त्यानंतर कोणत्याच सिनेमात ते दिसले नाहीत. आता चार वर्षांनंतर रणबीर-दीपिका ही जोडी एका जाहिरातीसाठी पुन्हा एकत्र आली आहे. एका  पेंटच्या  जाहिरातीत दोघे एकत्र दिसणारआहे.

या जाहिरातीचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाने एक फेसबुक स्टेटसही ठेवले होते. या जाहिरातीमधील दोघांच्या केमिस्ट्रीच कौतुकही होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेन्ड झाला असून रणबीर-दीपिकाने पुन्हा एकत्र काम करावे अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीत रणवीरला दीपिका आणि रणबीर कपूरने एकत्र काम केल्यावर प्रश्न  विचारण्यात आला होता प्रश्नावर रणवीर सिंग म्हणाला होता की, रणबीर आणि दीपिकाने एकत्र काम केल्यावर मला कधीच असुरक्षित वाटत नाही. याउलट प्रश्न विचारता रणवीर म्हणाला की, ‘मी तुम्हाला असुरक्षित माणूस वाटतो का ? मला हे पूर्ण माहीत आहे की मी कोण आहे आणि काय आहे. मला हे पूर्णपणे माहीत आहे की दीपिकावर जेवढं प्रेम मी करतो  तेवढं  प्रेम कोणीच करू शकत नाही.