‘लॉकडाऊन’मध्ये ‘दीपिका-रणवीर’ बनले ‘मिकी’ आणि ‘मिन्नी माऊस’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या लॉकडाऊनमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दोघंही चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. रणवीर आणि दीपिका दोघांनीही स्वत:ला डिज्नीच्या पात्रांमध्ये बदललं आहे. हे कपल आता मिकी आणि मिन्नी माऊस बनलं आहेत.

समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, रणवीरच्या हातात चमचा आहे. तर पत्नी दीपिकाच्या हातात मिठासाठी वापरला जाणारा डबा आहे. दोघांचा हा एक अॅनिमेटेड फोटो आहे. फोटोत शेअर करताना रणवीर म्हणतो, “हृ़दयाचा रस्ता पोटामार्गे जातो.” त्यानं या पोस्टमध्ये दीपिकालाही टॅग केलं आहे. दीपवीरचा हा फोटो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. कारण हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनीही यावर कमेंट केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणवीर आणि दीपिका दोघंही 83 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिनेमातही दीपिका रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. रणवीर या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.