भांगेत सिंदूर, लाल ट्रॅडिशनल साडीत अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी रणवीर सोबत तिरुपतीला गेली दीपिका (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज (गुरुवार 14 नोव्हेंबर) एक वर्षापूर्वी बॉलिवूडमधील लव्हली कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग विवाहबद्ध झाले होते. दोघेही आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. आपली अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी दीपवीर आंध्र प्रदेशातील तिरुपती स्थित व्यंकटेश मंदिरात पोहोचली आहे. दोघांनी देवाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. दीपिका आणि रणवीर दोघांचं कुटुंबही सोबत निघालं आहे.

मंदिर परिसरातील दीपवीरचे फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. दोघंही न्यूली मॅरिड कपलच्या लुकमध्ये दिसून आले. दीपिकाने लाल रंगाची हेवी ट्रॅडिशनल साडी नेसली आहे. भांगेत सिंदूर, हेवी गोल्ड ज्वेलरी घातलेली दीपिका पूर्णपणे सजलेली होती.

रणवीर देखील व्हाईट कुर्ता आणि पायजम्यात दिसून आला. सोबतच त्याने गोल्डन एम्ब्रॉयडरीचं जॅकेट घातलं होतं. सोबत त्याने गोल्डन बॉर्डर रेड शॉल घेतली होती. दीपिकाची साडी आणि रणवीरची शॉल यांचं परफेक्ट मॅच दिसत होतं.

व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनानंतर आता दीपवीर पद्मावती टेंपलला जाणार आहे अशी माहिती आहे. यानंतर ते अमृतसरमधील गोल्डन टेंपलला जातील. यानंतर ते 15 नोव्हेंबर रोजी पुन्हा मुंबईला परत जातील.

रणवीर आणि दीपिका आजच्या दिवशी 2018 साली इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाले होते. हे लग्न खूपच प्रायव्हेट पद्धतीने करण्यात आलं होतं. यात कुटुंबातील लोक आणि जवळचे मित्र, नातेवाईक यांचा समावेश होता.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच दोघे 83 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे. रणवीर आणि दीपिका ऑनस्क्रीनही पती पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहेत.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like