दीपिका -रणवीर यांचे लग्न १९ नोव्हेंबरला; सूत्र

मुंबई : वृत्तसंस्था

सोनम कपूरच्या लग्नानंतर आता बॉलिवूड मधील आणखी एक लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे असे वृत्त आहे. २०१८ पासून रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाबद्दलच्या वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या . यात अगदी त्यांच्या लग्नाच्या पाहुण्यांची लिस्ट पासून परदेशातील लग्न स्थळे आणि लग्न तारखांच्या पर्यंत बातम्या पसारल्या होत्या.आता मात्र त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. दीपिका आणि रणवीरचे लग्न दि १९ नोव्हेम्बरला होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सूत्रांकडून कळलेल्या माहितीनुसार या दोघांचे लग्न मुंबई येथे होणार आहे. दिपीकाने आपल्या लग्नाच्या शॉपिंग च्या तयारीला लागल्याची चर्चा देखील आहे. पण या बातमीबद्दल दीपिका आणि रणवीर दोघांकडून ही अफवा असल्याचे म्हंटले जात आहे. पण वारंवार सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार हे पावरफुल कपल लवकरच लग्नबंधनात अडकेल अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने देखील सांगितले होते की , पीपीका आणि रणवीर च्या लग्नाची आम्ही वाट पाहत आहोत.

काही माध्यमांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दीपिकाचे आई वडील बंगळूर मधून मुंबईला रणवीर यांच्या आई -वडिलांना भेटण्यासाठी आले होते. ही भेट दिपीकाच्या घरी झाली होती. तिथे लग्नाच्या तारखेबद्दल चर्चा झाली होती. याबरोबरच रणवीर आणि दीपिका ला डेस्टिनेशन वेडिंग करण्याची इच्छा आहे. पण रणवीरच्या आई वडिलांना लग्न मुंबईत व्हावे अशी इच्छा आहे . अशा बातम्या देखील माध्यमांमधून येत आहेत.