‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद आणि राजेश खन्नांची जोडी ! ‘अशी’ झाली अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची Entry

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा दीवार हा सिनेमा 1975 मध्ये रिलीज झाला होता, म्हणजेच 46 वर्षांपू्र्वी. दक्षिणेतील सर्व भाषेत या सिनेमाचे रिमेक झाले. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही या स्टोरीवर सिनेमे तयार करण्यात आले. आज आपण सिनेमाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहित आहेत.

या सिनेमानं अमिताभ यांच्या अँग्री यंगमॅनच्या इमेजवर शिक्कामोर्तब केलं. एन टी रामाराव आणि रजनीकांत यांनीही या स्टोरीवर सिनेमे बनवले. ते सुपरहिटही झाले. तुम्हाला माहित आहे का, यश चोपडा आणि राजेश खन्ना यांनी बनवलेली कपंनी यशराज फिल्म्सनं हा सिनेमा नाही बनवला. तर याचे निर्माते आहेत गुलशन राय. ज्यांनी याआधी यश चोपडा यांना जोशीला सिनेमात संधी दिली होती. देव आनंद यांना घेऊन केलेला सिनेमा जोशीला फ्लॉप झाला. नाही तर दीवार सिनेमात देव आनंद आणि राजेश खन्ना यांची जोडी बनवली गेली असती. तेव्हा आईची भूमिका वैजयंतीमाला साकारणार होत्या. देव आनंद यांना स्टोरी जमली नाही तर असं ठरलं की, राजेश खन्ना मोठ्या भावाची भूमिका साकारतील. नवीन निश्चल साकारतील लहान भावाची भूमिका. परंतु राजेश खन्ना आणि यश चोपडा यांच्यात त्या दिवसात अहंपणाचा चा टकराव सुरू झाला होता.

त्या दिवसात अमिताभ बच्चन आणि यश चोपडा यांचं खूप जमू लागलं होतं. त्यांनी विजय वर्माच्या रोलसाठी बिग बींचं नाव फायनल केलं. सलीम खाननं यासाठी बिग बींची यश चोपडांकडे शिफारस केली होती. असंही म्हटलं जातं की, स्टोरी आधी बिग बींकडे आली, नंतर ते तिला घेऊन यश चोपडांकडे गेले. अमिताभ सिनेमात आल्यानंतर यश चोपडा आईची भूमिका आधी वहिदा रहमान यांना देणार होते, परंतु जेव्हा कळालं की, वहिदा त्या काळात कभीं कभीं सिनेमात अमिताभ यांच्या अपोजिट आहेत, तेव्हा यश चोपडांनी हा विचार सोडून दिला. परंतु वहिदांच्या नशिबात होतंच की, त्या अमिताभ यांच्या आई बनतील. पुढे महान आणि कुली सिनेमात त्यांनी आईची भूमिका साकारली.

दीवार सिनेमातून वहिदा यांचं नाव कट झाल्यानंतर निरूपा रॉय यांची सिनेमात एन्ट्री झाली. लहान भावाच्या रूपात शशी कपूर यांची एन्ट्री झाली. दीवार सिनेमाला इंग्रजीत डब करून आय विल डाय फॉर मामा नावानं रिलीज करण्यात आला. हँगकॉंगचे शॉ ब्रदर्स यांनी याच स्टोरीला घेऊन द ब्रदर्स नावानं 1979 मध्ये सिनेमा बनवला. एनटी रामाराव यांनी याच स्टोरीवर तेलगूत मागाडू हा सिनेमा बनवला. रजनीकांत यांनी थी नावानं तमिळमध्ये हा सिनेमा तयार केला. मल्याळममध्ये ममूटी सोबत हाच सिनेमा नाथी मुथाई नाथी वारे नावानं बनवला गेला. पर्शियन आणि तुर्की भाषेतही दीवार या सिनेमाचे रिमेक तयार करण्यात आले आहेत.