Pune : महात्मा गांधींसह अनेकांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; 5 जणांवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह अनेकांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करुन बदनामी करणार्‍या 5 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अश्विनी पाटील (वय 30, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्या फेसबुक प्रोफाईल धारकांची नावे आहेत. आरोपींनी फेसबुकवर राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड केले. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.